
आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्…
बारामतीः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सचिव अजित दशावतारे यांच्या मुलीचा (वय १२) रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या मुलीने आत्महत्या केली, की तिची हत्या झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बारामतीतील रुई येथील साई गणेश नगरमध्ये या हत्येचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाचे पथक दाखल झाले आहे. यासंदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी, की रात्री आई आणि मुलीचं किरकोळ कारणांवरून भांडण झालं होतं. त्यानंतर संतापाच्या भरात मुलगी घरातून निघून गेली. दशावतारे कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार, पोलिस ठाण्यात केली आहे. रात्रभर शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर सकाळी घराजवळच तिचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.,
या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही. तपासानंतरच या मुलीची हत्या झाली, की तिने आत्महत्या केली याचा उलगडा होईल, असेही पोलिसांनी सांगितले. आमदार रोहित पवार बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.

