पुणे! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी केला मोठा घात; धक्कादायक माहिती समोर…

पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरातील एका युवकाचा त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी घात केला आहे. आरोपींनी पीडित तरुणाला एका गे ॲपवरून संपर्क साधत भेटायला बोलावले. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला ब्लॅकमेल करत अमानुष छळ केला. आरोपींचा छळ असह्य झाल्याने युवकाने मेट्रो स्टेशनच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी (वया २१) पिंपरी शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 5 ते 6 मित्रांनी एका गे अॅपवर बनावट अकाऊंट तयार करून पीडित युवकासोबत संपर्क साधला. काही दिवस या अॅपवर गप्पा मारल्यानंतर आरोपींनी पीडित युवकाला एका रूमवर बोलावून घेतले. पीडित युवक याठिकाणी भेटायला गेला असता आरोपींनी एका अन्य व्यक्तीसोबत नको त्या अवस्थेत फोटो आणि व्हिडीओ शूट केले. यानंतर सर्व आरोपींनी मिळून त्या मित्राला त्रास द्यायला सुरवात केली.

आरोपींनी पीडित युवकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी दिली. या सर्व प्रकाराने बदनामी होईल, यामुळे पीडित विद्यार्थी घाबरला आणि त्याने पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकाराम मेट्रो स्टेशन वरील पुलावरून झाली उडी मारून आत्महत्या केली.

दरम्यान, युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाकडे 50 हजारांची मागणी केली होती. तो हे पैसे कुणाला देणार होता, याचा शोध घेत असताना हा गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…

पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…

पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!