
पुणे शहरातील पत्रकारावर गुन्हा दाखल; पत्रकारांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट…
पुणे : पुणे शहरातील एका पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी पोलिस आयु्क्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यावर पोलिस उपायुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी केंद्रीय पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
एका तक्रारदाराने तक्रार देऊन देखील पुढील तपास किंवा पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने व्हिडिओ व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रकाशित झालेने पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजिक कार्यकर्ते यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाणे, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांच्याकडे दाद मागितली व व्हिडिओ म्हणून पुरावे देखील दिले. व्हिडिओ मध्ये साहित्य चोरून नेणारे दिसत असतानाही पोलिसांनी कारवाई न केल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतरांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. साहित्य चोरणारे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात आला होता याची दखल घेत पुण्यातील एका पत्रकाराने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर तो व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रसारित केला होता. तो व्हिडिओ पाहून काहींनी व्हिडिओ डिलीट करण्यासाठी संबधित प्रतिनिधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मार्केटयार्ड पोलिसांनी पत्रकारावर पहिल्यांदा NCR (एनसी) दाखल केला. एनसी दाखल करून दोन दिवस उलटले असतानाच एनसीतील तीच कलमे लावून पुन्हा त्यांनी गुन्हा दाखल केला. बातमी प्रसारित करणाऱ्या पत्रकारावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व प्रकारावर केंद्रीय पत्रकार संघाने बुधवारी (ता. १६) पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना समक्ष भेटून निषेध व्यक्त केला. एनसी दाखल केल्यानंतर गुन्हा का दाखल करण्यात आला? याबाबत आयुक्त देखील आश्चर्यचकित झाले. मार्केटयार्ड पोलिसांकडून त्या पत्रकाराला वारंवार फोन करून त्रास दिला जात असल्याचे देखील पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास शिष्टमंडळाने आणून दिले. त्यावर पोलिस उपायुक्तांशी चर्चा करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी केंद्रीय पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष रियाज मुल्ला, हिंदी मराठी डिजिटल मिडिया महासंघाचे अध्यक्ष मुजम्मिल शेख, सजग नागरिक टाईम्सचे संपादक मजहर खान, पोलिसकाका न्यूजचे सह संपादक संदीप कद्रे, सुनिल सांबारे, एसीएस न्यूजचे संपादक वाजिद एस खान, वेब न्यूज २४ चे संपादक सुधीर देशमुख, पुणे माझा न्यूजचे पत्रकार जमीर शेख, पुणे क्राईम न्यूजचे पत्रकार नागेश देडे, स्टार न्युज इंडियाचे सह संपादक जब्बार मुलाणी व इतर पत्रकार उपस्थित होते.
वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…
पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
पुणे शहरात घरफोडी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद…
Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

