पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

शिरूर, पुणे (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या मैत्रीणीने हा प्रकार रांजणगाव MIDCपोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत या नराधम बापाला अटक केली आहे. तसेच आरोपी विरुद्ध पोस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम येथील एक कुटुंब कारेगाव येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते. पिडीत मुलीचा बाप हा बाहेरख्याली असल्यामुळे तीन वर्षांपुर्वी आपल्या दोन मुलांना सोडून त्याची पहिली पत्नी निघून गेली. त्यानंतर बापाने काही दिवसांपुर्वी दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले. परंतु, आठ दिवसांपुर्वी आरोपीच्या त्रासाला कंटाळून दुसरी महिलाही घर सोडून गेली.

त्यानंतर या नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीसोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले. त्याच्या यातना सहन न झाल्याने मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठया भावाला सांगितले. त्यानंतर त्याने शेजारील व्यक्तीच्या मोबाईल वरुन आपल्या सख्या आईला फोन करुन सगळी हकीगत सांगितली. त्यामुळे तिने कारेगाव येथील आपल्या मैत्रिणीला तातडीने फोन करुन हि गोष्ट सांगितली.

त्यानंतर तिच्या मैत्रिणीने लगेचच पीडित मुलीच्या घरी धाव घेतली आणि तिथली परिस्थिती पाहुन रांजणगाव MIDC पोलिसांशी संपर्क साधला. रांजणगाव पोलिसांनी प्रथम त्या पिडीत मुलीला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय उपचारासाठी आधी शिरुर आणि त्यानंतर पुणे येथील शासकीय रुग्णालयात नेले आणि घटनेचे गांभीर्य  ओळखत नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील पिडीत मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून रांजणगाव पोलिसांनी नराधम बापाला पुणे येथील विशेष न्यायालयात हजर केले असता. न्यायालायने आरोपीला आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

कारेगाव येथील घटनास्थळी शिरुरचे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी भेट दिली. तर सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, अभिमान कोळेकर, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर यांच्या पथकाने हि कारवाई केली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या करत आहेत.

हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!