बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…
रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा सुधाकर चव्हाण (वय २४) ही युवती बेपत्ता होती. पण, दाभोळ समुद्रकिनारी नीलिमा हिचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नीलिमा हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर समजणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दापोली येथून निघालेली […]
अधिक वाचा...लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या (गोवंश) बैलांची अवैध वाहतूक करीत असलेला आयशर ताब्यात घेण्यात आला असून, 15 बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लातूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा 30/07/2023 रोजी रात्री शोध घेत होते. पथक रात्री 2 वाजण्याचे सुमारास पोलिस ठाणे अहमदपूर येथे पोचले […]
अधिक वाचा...पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…
पुणे : पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बसेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीच्या […]
अधिक वाचा...डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…
मुंबई : नीट पीजी परीक्षेचा टॉप असलेल्या आणि केईएममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत: ला इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. आदित्यनाथ पाटील असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिवडीतील टीबी रुग्णालयात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आदित्यनाथ पाटील (मूळ रा. जळगाव) हा केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर होता. मेडिसिन विभागात प्रथम वर्षाचे पदव्युत्तरचा विद्यार्थी […]
अधिक वाचा...RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…
मुंबई : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (ता. 31) गोळीबाराची घटना घडली. आरपीएफ शिपायाने गोळीबारात आपलाच सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. या प्रकरणी आरोपीला आरपीएफ शिपायाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफ शिपाई अमेय घनश्याम आचार्य (वय 26) यांनी आपल्या जबाबात ट्रेनमध्ये पहाटे घडलेला घटनाक्रम कथन केला. आरपीएफ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]
अधिक वाचा...जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…
मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरजवळ एका आरपीएफ जवानाने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी चेतन या जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली असून, तपासादरम्यान गोळीबाराचे कारण समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; पाहा वाहतूकीतील बदल…
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. या वेळी सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत पंतप्रधान मोदी हे पुण्यात असणार आहेत. पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग […]
अधिक वाचा...अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…
कराची (पाकिस्तान): भारतातून पाकिस्तानमध्ये आलेली अंजू इस्लाम धर्म स्वीकारुन फातीमा झाली आहे. शिवाय, 25 जुलै रोजी मित्र नसरुल्लासोबत लग्न केले आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंजू जोरदार चर्चेत आले. अंजूला 24 तासांत सुमारे 1.25 कोटींचे गिफ्ट मिळाले आहेत. सोशल मीडियावर अंजू आणि नसरुल्लाचा शनिवारी एक व्हिडिओ समोर आला आहे. दोघे एका रिअल इस्टेट कंपनीच्या सीईओसोबत […]
अधिक वाचा...Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…
कराची : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या बॉम्बस्फोटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५० जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही नेते व्यासपीठावर उभे राहून भाषण करत आहेत. यावेळी समर्थक जमाव झिंदाबाद-झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. […]
अधिक वाचा...
