येरवडा कारागृहात व्यसन जनजागृतीसाठी ‘मोहजाल’ नाटीका सादर…
पुणे (संदीप कद्रे): कारागृहात बंद्यांमध्ये व्यसनाप्रती जनजागृती होऊन कारागृहाबाहेर गेल्यानंतर व्यसनाच्या आहारी जावू नये व एक उज्वल भविष्य निर्माण करु शकतो ही भावना वृध्दींगत होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रधर्म फाऊंडेशन आणि राधिका क्रिएशन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने युवा कलावंतांनी हिंदी नाटीका ‘मोहजाल’ व्यसनमुक्ती समुपदेशन यावर आधारीत अतिशय उत्कृष्ट संदेशात्मक कार्यक्रम बंद्यांसाठी सादर केला. सदर संस्थेच्या २५ […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल…
पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या आरोपाखाली येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष भरत जाधव कारागृहातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल झाला आहे. येरवडा खुले जिल्हा कारागृह, पुणे येथील बंदी क्र. सी-949 आशिष भरत जाधव याने सोमवारी (ता. २०) दुपारी खुले कारागृहाचे अभिरक्षेतुन अनधिकृतपणे […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…
पुणे : येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दुपारी तुरुंगातील कैद्यांची मोजणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष जाधव असे कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका […]
अधिक वाचा...खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंडावर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंड नजीर सलीम शेख यास एम.पी.डी.ए कायद्यातंर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. आगामी लोकसभा, विधान सभा निवडणूक २०२४ ही पुणे शहरात निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी व पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कडक पावले उचलली असून, […]
अधिक वाचा...संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेले चौघे पकडले; जाणार होते…
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेल्या चार सराईत आरोपींना पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणामध्ये चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पळालेले चारही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या मार्गावर होते. यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा निकाल लागणार असल्यामुळे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. संगमनेर शहर पोलिस ठाण्यालगतचा कारागृह फोडून गंभीर गुन्ह्यातील चार […]
अधिक वाचा...संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पळाले…
संगमनेर (अहमदनगर): संगमनेर कारागृहातून चार कैदी पळून गेल्याची घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. संगमनेर तहसील कार्यालय परिसरात संगमनेर शहर पोलिस ठाणे तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलिस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेले. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…
पुणे (संदीप कद्रे): दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह उद्योग अंतर्गंत बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या कार्यक्रमादरम्यान केले. अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!
पुणे (संदीप कद्रे): इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे यांचेमार्फत ‘परिवर्तन- प्रिझन टू प्राईड टू प्राईड’ उपक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे सुरू आहे. २६ व २७ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित अखिल भारतीय अंतरकारागृह बुध्दिबळ स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय विजेते पदाचा मान मिळवत निर्विवाद वर्चस्व गाजविले व जागतिक कारागृह ऑनलाइन […]
अधिक वाचा...येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्याचा ससूनमध्ये मृत्यू…
पुणे (संदीप कद्रे): येरवडा येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका बंद्याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५९, रा. खेडेकर मळा, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत बंद्याचे नाव आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर या बंद्यावर लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं-३८१/२०२१, सेशन केस क्रमांक- ९९२/२०२१, भा. द. वि कलम ३०२, १२०-ब […]
अधिक वाचा...कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…
पुणे : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आज (रविवार) पहाटेच्या सुमारास स्वत:च्या कपड्यानी गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येईल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कोपर्डीतील हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे […]
अधिक वाचा...
