
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला तब्बल 16 फोन आरोपीच्या मोबाईलमधून करण्यात आले होते, अशी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी त्यांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती आला आहे. आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ सीबीआयच्या ताब्यात आला आहे. हत्या करून फरार होताना गाडी सोडून फरार आरोपी निघून गेले, यावेळी पोलिसांनी स्कार्पिओ गाडी ताब्यात घेतली. त्यात दोन मोबाइल आढळून आले. त्यावरून आरोपीच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळी 16 कॉल एका वरिष्ठ नेत्याला केले गेले होते, अशी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने तपासासाठी तीन पथक तयार केले आहेत. सीआयडीने अनेकांचे कॉल रेकॉर्ड काढण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय, वाल्मिक कराड यांचे दोन्ही अंगरक्षकांचे मोबाईल फोन फॉरेन्सीक तपासणीसाठी जप्त केले आहेत.
दरम्यान, सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

