मोहिनी वाघ आणि प्रियकर अक्षय जावळकर तपासादरम्यान येणार समोरासमोर…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना मारण्यासाठी पत्नी मोहिनी वाघ हिने प्रियकर अक्षय याच्या मदतीने आरोपींना हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे. वाघ यांची हत्या करण्यासाठी आरोपींना पाच लाख दिल्याचे सांगितले जाते. परंतु ही रक्कम मोहिनीने दिली की अक्षयने दिली? याचा तपास होणे अद्याप बाकी आहे. सतीश वाघ यांची हत्या प्रेमासाठी झाली की आर्थिक कारणांसाठी मोहिनीचे एवढे टोकाचे पाऊल उचलले? हा तपास करण्यासाठी सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी न्यायालयाकडे मोहिनी वाघ हिला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांचे अपहरण करून अक्षयसह त्याच्या चार ते पाच साथीदारांनी त्यांची हत्या केली. वाघ यांची हत्या करून दौंड तालुक्यातील घाटात त्यांचा मृतदेह फेकून दिला आणि आरोपी फरार झाले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला. पोलिस तपासांत अक्षय आणि मोहिनीच्या प्रेमसंबंधांचा धागा सापडल्याने बुधवारी रात्री पोलिसांनी मोहिनीला बेड्या ठोकल्या आहेत.

सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि अक्षय ऊर्फ सोन्या जावळकर या चारही आरोपींची पोलिस कोठडी न्यायालयाने कायम ठेवून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. मोहिनी वाघ हिला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तिने कोणत्या कारणासाठी पतीच्या हत्येची सुपारी दिली होती? या प्रमुख कारणासह तिचा मारण्याचा उद्देश काय होता? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी मोहिनीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि सरकारी वकिलांचा यु्क्तिवाद ऐकून वानवडी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेंद्र कवडे यांनी आरोपी मोहिनी वाघ हिला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, घटनेनंतर तपासासाठी पोलिस ज्यावेळी वाघ यांच्या घरी गेले त्यावेळी पतीच्या जाण्याचे अतीव दु:ख झाल्याचे नाटक करून मोहिनी वाघ हिने हंबरडा फोडला. कुटुंबातील इतर लोक तिला सावरण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु सतीश वाघ यांच्या जवळच्या व्यक्तींनी मोहिनेचे अक्षयसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती पोलिसांना दिल्याने सगळे बिंग फुटल्याची माहिती पुढे आली आहे.

मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जावळकर या दोन व्यक्तींची हत्या प्रकरण महत्त्वाची भूमिका असल्याने दोघांनाही समोरासमोर आणून नेमकी कोणत्या कारणासाठी हत्या केली? सुपारीचे पाच लाख रुपये मारेकऱ्यांना कोणी दिले? गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे, या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

satish-wagh-pune

सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!