
सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…
पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. स्वत:च्या मुलाच्या मित्रासोबतच मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोहिनी आणि अक्षयचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतो या प्रमुख कारणासह इतरही कारणामुळे मोहिनी त्रस्त होती. अखेर अक्षय आणि मोहिनीने ठरवून सतीश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले. अक्षय जावळकर सोबत असलेल्या प्रेमसंबंधाना विरोध करण्यावरून सतीश वाघ यांना संपवण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिनी वाघला बुधवारी (ता. २५) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या संदर्भात पुराव्याच्या आधारे मोहिनी वाघकडे सखोल चौकशी केली असता या घटनेची कबुली दिली. सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर याच्याशी असलेले संबंध यातून ही हत्या करण्यात आला आहे.
अक्षय जावळकर हा वाघ यांच्याकडे 15 वर्षांपासून भाडेकरू होता. यातून त्याची आणि मोहिनी वाघ यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यांच्यात जवळीक झाली. सतीश वाघ हे मोहिनी यांना मारहाण करत होते याच जाचाला कंटाळून मोहिनी ने हे कृत्य करायचे ठरवले. या साठी 5 लाख रुपये हे अक्षय जावळकर यानेच इतर आरोपींना दिले. मात्र, संपूर्ण कटामध्ये मोहिनी वाघचा सहभाग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.
आरोपी अक्षय जावळकर (वय ३२) हा जवळपास पंधरा वर्षे भाडेकरू म्हणून राहत होता. 2001 ते 2016 या दरम्यान अक्षय आणि त्यांचा परिवार हा सतीश वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होते. 2016 नंतर त्यांनी घर सोडले आणि दुसरीकडे भाड्याने घर घेतलं, तरी देखील त्यांच्यात संवाद होता. अक्षय हा जावळकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे. आई, वडील आणि अक्षय तिघे जण सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु होते. अक्षयच्या वडिलांचा भेळचा, वडापावचा गाडा आहे, तिथेच अक्षयही काम करतो. अक्षय आणि मोहिनी यांच्या प्रेमसंबंधाबाबत सतीश वाघ यांना 8 वर्षांपूर्वी कुणकुण लागली. त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले. मात्र, अक्षय याचे वाघ यांच्या घरी येणे-जाणे सुरुच होते. सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे मित्र होते, अशी माहिती आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक झाली आहे.
अक्षय आणि मोहिनीची लव्हस्टोरी कशी सुरू झाली…
अक्षय जावळकर हा मुख्य आरोपी हा सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र. वाघ यांच्याकडे अक्षयचे कुटुंब भाड्याने राहायला होते. यादरम्यान वाघ आणि जावळकर यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले. त्यावेळीच अक्षय आणि मोहिनी यांच्यात जवळीक वाढू लागली. दोघांच्या अनैतिक संबंधांची कुणकुण सतीश वाघ यांना लागली. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. अक्षय हा मोहिनी वाघ हिच्यापेक्षा वयाने दहा वर्ष लहान आहे. नवऱ्याला प्रकरण कळाल्याचे समजताच मोहिनीने अक्षयला सांगून खोली बदलण्यास भाग पाडले. अक्षयच्या कुटुंबाने 2016 साली वाघ यांची भाड्याची खोली सोडली. मात्र खोली सोडल्यानंतरही तो मोहिनीच्या संपर्कात होता. वरचेवर दोघे भेटायचे देखील. मात्र, दरम्यानच्या काळात विविध कारणावरून सतीश वाघ हे सातत्याने दारू पिऊन मोहिनीला मारहाण करू लागले.
अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला. हत्येच्या १५ दिवस आधी दोघांनी मिळून रणनीती आखली. त्यानुसार सुपारी देऊन सतीश वाघ यांचे अपहरण करून तब्बल ७२ वार त्यांच्यावर करण्यात आले. सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर याच्याशी असलेले संबंध यातून ही हत्या करण्यात आली.
दरम्यान, सतीश वाघ यांचे पहाटेच्या सुमारास चालण्यासाठी गेल्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आला. या प्रकरणातील चार जणांना पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली होती. पुन्हा एका फरार आरोपीला उस्मानाबाद मधून अटक करण्यात आली होती, त्यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर बरेचसे पुरावे पहिल्या दहा दिवसांमध्ये पोलिसांनी गोळा केले होते. त्याच्या अनुषंगाने सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचा तपास पोलिसांनी केला. त्यांना चौकशीवेळी काही प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणामागची तीन कारणे समोर आली आहेत. मोहिनी वाघ यांना त्यांच्या पतीकडून होणार त्रास, त्याचबरोबर मारहाण, आर्थिक व्यावहार त्यांच्या हातात यावे अशी त्यांची इच्छा होती. तिसरे कारण अक्षय जावळकर आहे, त्यासोबत मोहिनी वाघचे संबंध होते, अतिरिक्त पुरावे गोळा करण्याचे काम पोलिस सध्या करत आहेत, अशी माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

