पोलिसाची वर्दी घालून करायचा वसूली; पाहा दिवसाची कमाई…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने बनावट पोलिस असल्याचे भासवून अनेकांकडून पैसे वसून करत होता. संबंधित व्यक्ती दररोज पोलिसांचा गणवेश घालून रस्त्यावर फिरत असे. दिवसभर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचा शोध घेत असे. कुठलाही नियम मोडणारा कोणी दिसला की त्याला पकडून त्याच्याकडून पैसे वसूल करायचा. महिनाभर सर्वांना त्रास दिल्यानंतर अखेर पोलिसांनी या व्यक्तीला पकडले. एका महिन्यात त्याने लाखो रुपये उकळले असल्याचे उघड झाले आहे.

संबंधित व्यक्तीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. पोलिसांच्या गणवेशात फिरत असे आणि स्वतःला यूपी पोलिसांचा हवालदार म्हणवून घेत असे. महिनाभरापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून सात हजार तीनशे रुपयांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांना त्या व्यक्तीच्या खिशातून सापडलेले हे एक दिवसाच्या वसुलीचे पैसे होते, यावरुन अंदाज लावता येऊ शकतो की, जर एखाद्या व्यक्तीची एका दिवसातील कमाई 7300 रुपये असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की त्याने एका महिन्यात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा केले आहे. शिवबक्श (रा. रायबरेली) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…

तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

सॅल्युट करताना पोलिसांना संशय आला अन् अलगद सापडला…

Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!