रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू…

चेन्नईः तमिळनाडूच्या डिंडीगूल येथील एका खासगी रुग्णालयात लागलेलया भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. रुग्णालयाला आग लागली, तेव्हा रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर रुग्णांना तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रुग्णालयाला गुरुवारी (ता. १२) रात्री १० च्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन आणि बचाव दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. दोन्ही दलाकडून तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या दुर्दैवी घटनेत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

रुग्णालयात आग पसरल्यानंतर बचाव दलाने यातील २९ रुग्णांना सुखरुपपणे बाहेर काढले. त्या सर्वांना जवळच्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही. या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना डिंडीगूलचे जिल्हाधिकारी एमएन पूंगोडी यांनी सांगितले की, ‘गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही आग लागली होती. बचाव दलाने यातल्या काही रुग्णांना सुखरुपपणे बाहेर काढले असून त्यांना जवळच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी पुष्टी केल्यानंतरच मृतांचा निश्चित आकडा सांगितला जाईल.’

दरम्यान, आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईंनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…

गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!