योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…

पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय 55) यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच योगेश टिळकर यांच्या मामांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर चार आरोपींनी त्यांना जबरदस्ती एका गाडीत बसवले. पुण्यातील हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले. संध्याकाळी निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात धक्का बसला.

या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. पुणे पोलिसांच्या हाती मोठं यश लागले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांचा खून अपहरण झालेल्या गाडीतच करण्यात आला. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून सुपारी देऊन करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश टिळेकर यांना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील पळून गेलेल्या हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरु आहे.

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं समोर आली आहेत. पवन शर्मा (रा. धुळे) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी) अशी या संशयितांची नावे आहेत. सतीश वाघ यांचा धावत्या मोटारीत खून करण्यात आला. तसेच आरोपींनी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील मोकळ्या जागेत टाकून दिला. त्यानंतर आरोपी अर्धा-पाऊण तासात पुन्हा त्याच गाडीतून पुण्याकडे परतले.

हडपसर पोलिस आणि पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ८ ते १० संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. संशयितांमधील दोघांकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल होऊ शकते, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील इतरही फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे, संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात नवनाथ गुरसाळे हे नावंही समोर आले आहे. गुरसाळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो, तर शर्मा हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपींची सतीश वाघ यांच्यासोबत वैयक्तिक दुश्मनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता ही दुश्मनी कशामुळे झाली आणि हत्येचं कारण काय असू शकते, याचा तपास पोलिस करत आहेत.

सतीश वाघ यांचे सोमवारी अपहरण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे तपासाला सुरुवात केली होती. ज्या गाडीतून वाघ यांचं अपहरण झाले होते, तशा प्रकारच्या तब्बल ८०० गाड्या पोलिसांनी आरटीओच्या मदतीने तपासल्या. त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर अशा सहा जिल्ह्यातील गाड्यांची माहिती घेण्यात आली. आरटीओकडून मिळालेली माहिती आणि इतर टेक्नीकल डेटाच्या अधारे पोलिसांनी आरोपींच्या लोकेशनचा शोध घेतला.

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

satish-wagh-pune

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!