महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

बीडः केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे सोमवारी (ता. ९) दुपारी भर रस्त्यातून अपहरण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो (एमएच- ४५/ बी-३०३२) मस्साजोगकडे जात होते. डोणगाव फाट्याच्याजवळ असलेल्या टोलनाक्या जवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ (एमएच-४४/झेड-९३३३) त्यांच्या वाहनासमोर आडवी आली. त्या स्कार्पिओतून सहा जण खाली उतरले. त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडून कारमध्ये पाहिले व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजुला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली.

अपहरणकर्त्यानी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवून केज शहराच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. अपहरण केल्यानंतर अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथके तपासाठी रवाना करण्यात आले. या पोलीस पथकातील पोलीसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज- नांदूरघाट रस्त्यावर दैठना फाटा येथे मिळून आला. त्यांच्या अंगावर मारहाणीचे व शास्त्राचे वार आहेत.

दरम्यान, मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेले सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यानी त्यांचा खून केला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ही सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) यांची असल्याची माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!