पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी गावठी हातभट्ट्या केल्या उध्वस्त…

 

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे दोन भट्टया उध्वस्त करुन, त्यामधील ४,३४० लिटर गावठी हातभट्टी दारु व गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १२,००० लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन पकडून ९,२७,५००/- रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे शहरात अवैध धंदे/ वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्त यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार व सर्व अधिकारी, अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतूक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेले आदेश/सुचनांप्रमाणे ०६/१२/२०२४ व ०७/१२/२०२४ रोजी काळेपडळ कडील तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक अमित शेटे, परि-पोलिस उप निरीक्षक, अनिल निबाळकर, पोलिस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलिस हवालदार, ७९५० संजय देसाई, पोलिस अंमलदार ४८०२ लक्ष्मण काळे, पोलिस अंमलदार ८८७१ विशाल ठोंबरे, पोलिस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी असे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, घुले यांचे घराजवळील असलेल्या ओढयालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं.१३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे येथे
१) जगदीश भैरुलाल प्रजापती, वय २४ वर्षे, रा.ढेरेकंपनी, म्हसोबा मंदीराजवळ,काळेपडळ, हडपसर, पुणे व
२) गुलाब संपकाळ रचपुत वय ३३ वर्षे, रा. पिजनवस्ती, होळकरवाडी पुणे हे त्याचे मालक
३) जितू ऊर्फ माकनावत, वय वर्षे अंदाजे ३० वर्षे, रा. वडाचीवाडी,पुणे
४) करण चित्रावत, वय वर्षे अंदाजे ३० वर्षे, रा. वडाची वाडी, पुणे असे मिळुन औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, घुले यांचे घराजवळील असलेल्या ओढयालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं. १३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे या ठिकाणी गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे तयारीत आहेत.

मिळालेल्या बातमीच्या आधारे मानसिंग पाटील, वपोनि काळेपडळ पोलिस ठाणे व वर नमूद पोलिस स्टाफ यांनी औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, घुले यांचे घराजवळील असलेल्या ओढयालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं.१३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु गाळणारे दोन जणांना ताब्यात घेतले. सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकुण १२४ कॅन व १२,००० लिटर कच्चे रसायनसह दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ९,२७,५००/-रु. ( नऊ लाख सत्ताविस हजार पाचशे रुपये ) कि.चा मुद्देमाल पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत कोंढवा पोलिस ठाणेस गु.र.नं.१३३२/२०२४ प्रमाणे भा.न्या. सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ब) (क) (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास परि. पोलिस निरीक्षक अनिल निंबाळकर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजन कुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त. पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे,वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक, अमित शेटे, परि-पोलिस उप निरीक्षक, अनिल निबाळकर, पोलिस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलिस हवालदार, ७९५० संजय देसाई, पोलिस अंमलदार ४८०२ लक्ष्मण काळे, पोलिस अंमलदार ८८७१ विशाल ठोंबरे, पोलिस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

पुणे शहरातील काळेपडळ पोलिस तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी…

पुणे पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी केली कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…

पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…

पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!