
धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीची हत्येचा तपास पोलिसांनी उघड केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या हत्येचा कट इतर कोणी नाही तर पत्नीने आखल्याचे उघड झाले आहे.
मृत पतीने दत्तक घेतलेला मुलगा आणि गावातील एका व्यक्तीला सोबत घेऊन तिने पतीची हत्या केली होती. गावातील व्यक्तीला तिने अडीच लाखांची सुपारी दिली होती. इटावा जिल्ह्यातील ऊसराहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. या हत्येमागे अनैतिक संबंध कारणीभूत आहेत. मृत व्यक्तीच्या पत्नीचे दत्तक घेतलेल्या मुलासोबत अनैतिक संबंध होते. पतीला अनैतिक संबंधाची माहिती समजल्यानंतर विरोध केला. पत्नीने त्याला रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला. मारेकऱ्याला सुपारी दिली आणि रात्री घरातच हत्या घडवून आणली. पती झोपेत असतानाच त्यांची हत्या करण्यात आली.
मनोज जाटव यांचा त्यांच्याच घरात 12 नोव्हेंबर रोजी संशयितरित्या मृतदेह आढळला होता. मनोज यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. पोलिसांनी तपास सुरु केला असता मनोज यांनी गावातील राहुल कुमार (वय २३) याला दत्तक घेतल्याचे उघड झाले. राहुल आणि मनोजची पत्नी यांच्यात पुढे अनैतिक संबंध निर्माण झाले. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने मनोज यांची त्यांची पत्नी आणि मुलाने 15 नोव्हेंबरला रात्री हत्या करण्याची योजना आखली होती.
गावातील विकास जाटव याला अडीच लाखात हत्येची सुपारी देण्यात आली होती. यासाठी त्याला 27 हजारांचा अॅडव्हान्स देण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि मुलगा राहुल याला अटक केली आहे. दरम्यान विकास फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…
अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..
सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…
सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…

