पुणे शहरात शरद पवार गटाचा नेत्यावर भरदुपारी हल्ला…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेशकरून वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांनी आज (मंगळवार) दुपारी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या असून, यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत.

पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार आज दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या उपस्थित त्यांनी हा प्रवेश करून वडगाव शेरीचे उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे यांचा प्रचार सुरू केला होता.

चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कार चालक सचिन गायकवाड दुपारी एमएसईबी ऑफिसकडे गेले होते. त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठिमागून कारवर दगड मारला. तेव्हा कार चालक घाईने उतरले व पाठिमागे गेले, त्याचवेळी समोरून देखील सिमेंटचा गट्टू काचेवर मारून तोडफोड केली. या दगडफेकीत चंद्राकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चंद्रकांत टिंगरे यांच्यावर कोणी आणि कशामुळे हल्ला केला? याचा तपास सुरु केला आहे.

अनिल देशमुख यांच्या गाडीवर तुफान दगडफेक, गंभीर जखमी, डोक्यातून रक्तस्त्राव…

अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…

विरार प्रकरण! भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक

भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!