एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…

मुंबईः मुंबईच्या गोराई परिसरात मृतदेहाचे 7 तुकडे करुन ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यांमध्ये टाकून ते गोणीत भरण्यात आले होते. पोलिसांनी खूनाचे गुढ उकलले असून, मृत प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. आरोपीने हत्या करुन त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे केले होते. पण, हातावर गोंदवलेल्या इंग्रजी अक्षरांमुळे या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. रघुनंदन जितेंद्र पासवान (रा. बिहार) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

गोराई येथे ज्या व्यक्तीला मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तीचे आंतरधर्मीय अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. पुढे मुलीनं त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते. त्यानंतरही तो तिला भेटण्यासाठी बिहारहून मुंबईत आला होता. त्यानंतर मोठा वाद झाला. प्रकरण मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले आणि त्या युवकाची मुलीच्या भावाने हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोराईजवळ ज्या व्यक्तीच्या मृतदेह गोणीत सापडला, तो मुळचा बिहार दहभंगा येथील कानहोळी गावातील रहिवाशी होता. मुलीच्या भावाने रघुनंदनला भाईंदर येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर तो त्याला घेऊन एका घरात गेला. तिथे दोघांनी दारू प्यायली. रघुनंदन ज्यावेळी दारूच्या नशेत पूर्णपणे दंग झाल्या, त्यानंतर मुलीच्या भावाने त्याचा खून केला. नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि रंगाच्या डब्ब्यांमध्ये भरले. ते सर्व डब्बे एका गोणीत भरले आणि गोराई येथे नेत एका निर्जनस्थळी फेकून दिले. रघुनंदनच्या हातावरच्या टॅटूवरुन सर्व प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी रघुनंदनच्या हातावरच्या टॅटूवरुन मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाच्या हातावर ‘आरए’ अशी इंग्रजी अक्षरं कोरलेली होती. रघुनंदनचं ज्या मुलीवर प्रेम होतं, त्या मुलीचं नाव ‘ए’ वरुन सुरू होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुलीला पाच भाऊ असून हत्येत केवळ एकाच भावाचा सहभाग आहे. आंतरधर्मीय प्रेमसंबंधामुळे मुलीच्या नातेवाईकांनी रघुनंदनची हत्या केल्याचा संशय त्याचे वडील जितेंद्र नाव पासवान यांनी व्यक्त केली आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जितेंद्र यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हातावर गोंदवलेल अक्षरांच्या आधारे रघुनंदनच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह ओळखला.

मृत रघुनंदन बिहार दहभंगा येथील कानहोळी गावातील रहिवाशी होता. वर्षभरापूर्वी रघुनंदन एका रुग्णालयात काम करत होता. त्यावेळी त्यानं एका 17 वर्षांच्या मुलीला औषधं देऊन मदत केली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर हळूहळू त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले होते. मुलीच्या घरच्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रघुनंदनला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे जाऊन गावातील काही वरिष्ठांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले होते. त्यानंतर मुलीला तिच्या भावांनी मुंबईला आणलं. तरीसुद्धा रघुनंदन मुलीला सारखा फोन करायचा. त्यामुळे कुटुंबीय संतप्त झाले होते. त्याच रागातून मुलीच्या भावाने रघुनंदनचा खून केला.

एका गोणीत सापडला मृतदेह; मृतदेहाचे एकूण सात तुकडे…

पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…

संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…

प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!