पोलिसांना यश! शारीरिक संबंधास नकार दिल्याने प्रेयसीला पुलावरून ढकलले…

ठाणे : ठाणे जिल्ह्यात महिलेचा मृतदेह सापडल्याच्या एका वर्षानंतर पोलिसांना हे प्रकरण उलगडण्यात यश आले आहे. महिलेची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, प्रियकरासह तीन आरोपींना अटक केली आहे. शारिरिक संबंध ठेवायला नकार दिल्यामुळे महिलेला पूलावरून धक्का दिला, त्यामुळे महिला पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला होता.

मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव मानसी भोईर (वय २३) आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बेपत्ता झाली होती. पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे, जो आधीपासूनच एका वेगळ्या प्रकरणात जेलमध्ये आहे. आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम 302, 201 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ गर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी भोईर हिच्या कुटुंबाने ती हरवल्याची तक्रार दिली होती, यानंतर काही दिवसांनी ठाण्याच्या कळवा खाडीमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यावेळी महिलेची ओळख पटली नव्हती, तसेच तिच्या हत्येचाही कोणता पुरावा मिळाला नव्हता. मानसीच्या शरिरावरचे टॅटू आणि सापडलेल्या मृतदेहावरच टॅटू मॅच होत असल्याचे ठाणे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. मानसीच्या बहिणीनेही हा मृतदेह तिचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी मानसीच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) चा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना एका व्यक्तीवर संशय आला, याचं नाव आदिल शेख असल्याचे समोर आले. आदिल शेख आधीपासूनच मानसीच्या संपर्कात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले.

आदिल शेख हा 4 नोव्हेंबरच्या रात्री कळवा खाडीच्या जवळपासच असल्याचे तपासादरम्यान समोर आले. याच ठिकाणी मानसीचा मृतदेह मिळाला होता. या दोघांमध्ये झालेल्या शेवटच्या बोलण्यानुसार मानसी त्या रात्री माजीवाडा कळवा पुलाजवळ आदिला भेटायला गेली होती. आदिलने शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला, ज्याला मानसीने विरोध केला, यामुळे आदिल संतापला आणि त्याने मानसीला पुलावरून धक्का दिला.

आदिलने धक्का दिल्यानंतर मानसी पुलावरच्या एका खांबात अडकली आणि बेशुद्ध पडली. यानंतर आदिलने महबूब मकदूम अली शेख (वय 28) आणि रुपेश शिवकुमार यादव उर्फ सोनू (वय 23) या दोन सहकाऱ्यांना बोलावले. यानंतर तिघांनी खांबाला लटकलेल्या मानसीला धक्का दिला आणि पाण्यात ढकलले, यात तिचा मृत्यू झाला. मानसीचा मृतदेह घटनास्थळापासून काही किमी लांब मिळाला. सध्या तीनही आरोपी कारागृहात आहेत.

धक्कादायक! थरकाप उडवणारी चौघांच्या हत्येची स्टोरी…

मैत्रिणीला अडवून म्हणाला; दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय संबंध?

नवरा कामाला गेला की प्रियकराला घरी बोलवायची; एक दिवस…

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!