कोल्हापुरात फार्म हाऊसवर छापा; 9 युवतींसह 31 जण ताब्यात…

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी एका बेकायदा पार्टीवर छापा टाकत ९ नृत्यांगना युवतींसह ३१ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका फार्महाऊसवर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. गगनबावडा परिसरातील कोदे येथे बेकायदा पार्टीवर छापा टाकला. पोलिस उपाधीक्षक आप्पासो पवार यांच्या पथकाने छापेमारी केली. ऐन दिवाळीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत अश्लील हावभाव करून नाचणाऱ्या 9 नृत्यांगनांसह 31 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या 31 जणांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे सांगलीसह कोल्हापुरातील नागरिकांचा समावेश आहे.

गगनबावड्यातील कोदे परिसरात आंबेवाडी येथील नयनिल फार्म रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 4 लाख 51 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दारू मोबाईल आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ३१ जणांविरोधात गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

राजकीय नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा; मिळाल्या धक्कादायक वस्तू…

जळगावमध्ये कुंटणखान्यावर छापा, 10 ‘डर्टी आंटी’सह 60 युवती ताब्यात…

पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…

हॉटेलवर रात्रीच्या सुमारास छापा अन् बारबालांसह एकच पळापळ…

लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!