
धक्कादायक! दुचाकीवरील तिघांनी युवतीला सुद्धा दुचाकीवर बसवले अन्…
अमरावती : घरात वाद झाल्यानंतर रागाच्या भरात निघून गेलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवती घरातून बाहेर पडल्यानंतर तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. गाडगे नगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
एका युवतीचा (वय २५) मंगळवारी रात्री आईसोबत वाद झाला होता. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास ती घरातून निघून गेली. शेगाव नाका येथे तिने एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. त्यावर आधीच दोघेजण होते. युवतीला सुदधा दुचाकीवर घेतले. युवकाने दुचाकी एका बारवर थांबवून बिअर विकत घेतली. त्याचवेळी त्यांनी आणखी तीन सहकाऱ्यांना चारचाकी गाडी घेऊन येण्यास सांगितले. त्या गाडीने तरुणीला सोबत घेऊन तरुण अज्ञात स्थळी गेले.
युवकांनी गाडीत बसून दारू प्यायली आणि त्यानंतर गाडीतच युवतीवर अत्याचार केले. अत्याचारानंतर पीडित युवतीला अमरावतीतल्या बडनेरा परिसरात सोडून देत पळून गेले. दरम्यान, युवतीने घर गाठत घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. घरच्यांनी युवतीला सोबत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. नांदगाव पेठ मार्गावर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून एका आरोपीची ओळख पटवली आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता इतर आरोपींची माहिती समोर आलीय. अटक केलेल्या आरोपींची नावे मनोज डोंगरे, अक्षय सरदार, अजय लोखंडे, मिलिंद डाहाट आणि प्रथम धाडसे अशी आहेत. या सर्वांचे वय २० ते ३० वर्षे इतकं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…
मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…
मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार…
संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…
युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

