
सॉफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य अन् अश्लील चित्रीकरण…
पुणे : पिंपरी-चिंचडवडमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नवऱ्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. शिवाय, त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून त्याचे अश्लिल चित्रीकरण केले आहे. पुनावळे येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली आहे.
पीडित युवतीने (वय ३०) बुधवारी (ता. १६) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पीडित युवतीच्या पतीसह चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती आणि तिचा पती हे दोघेही सॉफ्टवेयर इंजिनियर आहे. तिच्या पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. तसेच या अत्याचाराची अश्लिल चित्रफित तयार केली. ती चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही केले. यास विरोध केला असता तिला शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
सप्टेंबर 2023 ते 6 एप्रिल 2024 या आठ महिन्यांच्या कालावधीत पीडितेसोबत हा सर्व प्रकार घडला. पीडित युवतीने पतीला विरोध केला असता, त्याने तिला शिवीगाळही केली. पती-पत्नीमध्ये बरेच वाद सुरू आहेत. अखेर युवतीने रावेत पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला सर्व प्रकार कथन केला आणि पती व त्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. युवतीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह एकूण चार जणांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
चोराला 10 बायका, 6 मैत्रिणी, 5 स्टार हॉटेलमधील वास्तव्य अन् विमानाने प्रवास…
विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…
मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…

