
जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
धुळे : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज (बुधवार) धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. गळ्यात सरकारचा निषेध नोंदवणारी पाटी परिधान करुन चंदू चव्हाण यांनी धुळ्यात न्यायाची भीक मांगो आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे.
धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी चंदू चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, ‘गेल्या अकरा वर्षांपासून मी लढा देत आहे. मात्र, मला केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारकडून न्याय मिळत नाही. लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायाची भीक मागण्यासाठी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे. जवान चंदू चव्हाण यांनी भीक मागो आंदोलन करताना वर्दीवर होते. शिवाय, गळ्यात पाटी व पाटीवर स्कॅनर होते. त्यांच्याकडे लक्ष वेधले जात होते. त्यांच्या आंदोलनाची नागरिकांमध्ये चर्चा असून, त्यांना न्याय द्यायला हवा, अशी नागरिकांची भावना आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांची लष्करामध्ये ११ वर्षे नोकरी झाली आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे. चंदू चव्हाण यांनी मुंबई येथील अझाद मैदान व धुळे येथेही उपोषण केले होते.
चंदू चव्हाण आणि हरेंदर यादव हे लखनौ व बनारस येथील रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अखिलेश यादव यांची त्यांनी भेट घेतली आहे. पण, न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रस्त्यावर भीक मागण्याचे आंदोलन सुरूच राहणार आहे. पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर हिला सरकार नोकरी आणि राजकीय निवडणूक लढविण्यासाठी तिकीट देत आहे. पण, देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढून आणि पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतल्यानंतर आमच्या सारख्या जवानांवर भीक मागण्याची वेळ येत आहे. हा कोणता न्याय? देश भरातील अनेक जवानांवर अन्याय होत आहे. पण, ते पुढे येत नाहीत. अन्यथा विषय दाबला जातो. पण, आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढत राहणार आहोत, असे चंदू चव्हाण आणि एस. के. यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी पाकिस्तान कसा आणि कशासाठी गेलो होतो, हे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगावे असे चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.
Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…
Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…
Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…
जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

