
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणारा महिलेच्या शेजारी जाऊन झोपला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भदोही येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपीसह त्याचे दोन्ही भाऊ फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
भदोही येथे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने या विवाहित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली होती. पण, पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे महिलेने न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणातला आरोपी फरार आहे.
पीडित विवाहित महिलेने (वय ३४) याबाबत तक्रारीत म्हटले आहे की, ‘17/18 जुलै रोजी रात्रीच्या वेळी घरातला वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी शेजारी राहणारा कंचू (वय 32) चोरून घरात घुसला आणि माझ्या बेडवर येऊन झोपला. मला पती आहे असे वाटले. मी त्याच्या कुशीत झोपले. त्यानंतर कंचू माझ्याशी अश्लील वर्तन करू लागला. त्याच्या कृत्यांमुळे मी त्रस्त झाले आणि त्याला जोरात धक्का मारला. त्यानंतर थोडा प्रकाश पडला आणि तो माझा पती नसल्याचे दिसले. मग मी आरडाओरड सुरू केली; पण तोपर्यंत त्याने बलात्कार केला होता. माझा आवाज ऐकून कुटुंबातले आणि शेजारचे लोक जमा झाले.’
पीडित महिलेने आरोपीला पकडून ठेवले होते. लोकांनी त्याला मारहाण केली. पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. यादरम्यान गमई आणि बोरा हे कंचूचे दोन्ही भाऊ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला शिवीगाळ केली. पोलिस दाखल होण्यापूर्वीच तिघेही घटनास्थळावरून फरार झाले.
‘मी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी माहिती दिली; पण मला पोलिस स्टेशनमधून हाकलून देण्यात आलं,’ असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणाची कोणीच दखल घेत नसल्याने सात ऑगस्टला मुख्य न्यायदंडाधिकारी सबीहा खातून यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपी कंचूविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सध्या आरोपी आणि त्याचे दोन्ही भाऊ फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दिराला शेजारी झोपलेले पाहिले अन् नवरी हादरलीच; दोन महिने…
घराशेजारी राहणाऱ्या महिलेसाठी बनली पुरुष अन् फसवलं…
वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…
भरदिवसा चौकात रस्त्याकडेलाच बलात्कार; Video Viral…
धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…

