पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे. तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २५ पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.

युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक डाटाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. घटना घडली तिथं मोबाइलला रेंज नाही. बोपदेव घाटात सासवडच्या बाजूला तीन संशयिताचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्यानंतर साधारण १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे. शिवाय, पोलिसांनी आरोपींचे स्केज जारी केले आहे.

दरम्यान, बोपदेव घाटात गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही पीडित मुलगी पुण्यातल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत आहे, तर मुलगा सीएची तयारी करत आहे. बोपदेव घाटामध्ये पीडित तरुणी आणि तरुण टू व्हीलरवर आले होते. तर आरोपीही टू व्हीलरवरच होते.

बोपदेव घाटात तीन नराधमांनी गुरूवारी रात्री मुलाचा शर्ट काढला आणि बेल्टने त्याचे पाय बांधून ठेवले. शिवाय, गाडीची चावी आणि मोबाईलही काढून घेतला. आरोपींनी मुलीची चांदीची अंगठीही काढून घेतली. आरोपींपैकी एकाकडे चाकू होता, या चाकूने त्याने धाक दाखवला. मुलीवर सामूहिक अत्याचार करून तीनही आरोपी पुन्हा वर आले. मुलीला परत थोडं वरती घेऊन आले आणि तिला तिथे सोडले आणि पळून गेले. यानंतर मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवले. युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिस स्टेशन गु रजि नंबर 1122/2024 या गुन्ह्यातील संशयित आरोपींचे स्केच असून त्यांचे बाबत काही माहिती मिळाल्यास खालील नंबर वर त्वरित संपर्क साधावा.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन श्री विनय पाटणकर मो नं 8691999689
पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री. युवराज हांडे मो नं. 8275200947 /9307545045
नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880

पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…

पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!