Video: पुणे शहरातील रस्ता खचला अन् दुचाकींसह संपूर्ण ट्रकच गेला खड्ड्यात…

पुणे : पुणे शहरातील समाधान चौक परिसरात रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना दरम्यान जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. खड्यात अडकलेल्या ट्रकच्या चालकाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

पुणे शहरातील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये अचानक पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता खचून संपूर्ण ट्रक थेट खड्ड्यांमध्ये कोसळल्याची घटना घडली. रस्त्यावर अचानक पडलेला हा खड्डा, साधारणपणे 25 फूट खोल आहे. ट्रकसह दोन दुचाकीही खड्ड्यात पडल्या आहेत.

जवळील ड्रेनेज साफ करण्यासाठी ट्रक आला होता. तेथील जवळील इमारतीच्या खालून भूमिगत मेट्रो गेली आहे. 1925 सालची बिल्डिंग असून त्याखालूनच 100 फूट खाली मेट्रोचे भुयार गेले आहे. तसेच या खड्ड्याच्या खाली कोणतंही चेंबर नव्हते की पाण्याची टाकी? मग तरीही हा कसा खड्डा पडला? असा प्रश्न सिटी पोस्ट खात्याला पडला आहे.

पेविंग ब्लॉकने रस्ता माखलेला असताना सुद्धा अचानक खड्डा पडून संपूर्ण ट्रकच खड्ड्यांमध्ये गेल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अग्निशामन दलाला माहिती कळवण्यात आली. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…

पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!