संगमनेर हादरलं! आठवडाभरात वाडेकर कुटुंबच संपलं; चौघांचीही आत्महत्या…

अहमदनगरः संगमनेर शहरातील वाडेकर गल्ली येथे राहणाऱ्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ३) दुपारी घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. या दाम्पत्याच्या मोठ्या मुलाने साधारण सात दिवसांपूर्वी पुण्यात, तर लहान मुलाने यापूर्वी वाडेकर गल्ली येथील घरात आत्महत्या केली होती.

गणेश मच्छिंद्र वाडेकर (वय ५२), गौरी गणेश वाडेकर (वय ४८ रा. वाडेकर गल्ली) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गणेश वाडेकर यांचा पुतण्या प्रशांत पद्माकर वाडेकर (रा. मोगरा कॉलनी, पंपिंग स्टेशन, संगमनेर) यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यची नोंद केली आहे.

गणेश वाडेकर हे संगमनेर नगर परिषदेत कर्मचारी होते, त्यांनी काही महिन्यांपूर्वी ऐच्छिक सेवानिवत्ती घेतली होती. गौरी वाडेकर या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवेत होत्या. मंगळवारी दुपारी पाचच्या सुमारास प्रशांत वाडेकर यांना त्यांचे पुणे येथील नातेवाईक राजेंद्र कापरे यांनी फोनवरून गणेश आणि गौरी वाडेकर या दोघांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले. त्यानंतर प्रशांत वाडेकर यांनी तातडीने तेथे जाऊन पाहिले असता, घराच्या पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये गणेश वाडेकर यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला होता, त्याच बेडरूमच्या समोरील बेडरूममध्ये गौरी वाडेकर यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेला होता. पोलिसांनी त्या दोघांनाही खाली काढून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करत त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, गणेश वाडेकर यांचा मोठा मुलगा श्रीराज वाडेकर (वय २१) याने सात दिवसांपूर्वी पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लहान मुलगा श्रेयस वाडेकर (वय १६) याने दिड वर्षांपूर्वी वाडेकर गल्ली येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर आई-वडिलांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला आहे. पती-पत्नीने आत्महत्या करण्याआधी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना या दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. वाडेकर यांच्या मुलाचा पुण्यात मृत्यू झाला होता, त्याच्या तपासकामात त्यांनी वाकड पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…

आत्महत्या केलेल्या बापलेकाच्या घराची पोलिसांकडून झडती; एका चिठ्ठीने वाढवलं गूढ…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!