
ज्येष्ठ नेत्याने कुटुंबियांसमवेत खाल्लं विष, चौघांचाही मृत्यू…
रायपूर (छत्तीसगड): काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्ले आहे. विष खाल्लेल्या चौघांना उपचारासाठी बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घर सील करण्यात आले असून, पुढील तपास करत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक 10) यांनी त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे. पोलिस अधीक्षक राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितले की, ‘पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय 55), मुलगा सूरज यादव (वय 27) आणि निरज यादव (वय 32) यांच्यासमवेत विष प्राशन केले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात निरज यादव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तिघांना हलवण्यात आले होते. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झाला आहे.’
पंचराम यादव हे काँट्रॅक्टरचे काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शिवाय त्यांना ह्रदयाशी निगडीत आजारही होता. शिवाय पंचराम यादव यांच्या पत्नी कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांचा मुलगा निरज यादव खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे काँट्रॅक्ट घेत होता. आपण टोकाचं पाऊल उचलत आहोत, याबाबत कोणाला माहिती मिळू नये यासाठी नेत्यासह कुटुंबियांनी घरा बाजूचे दोन्ही गेट बंद केले होते. दोन्ही बाजूंनी कुलुप लावले आणि तिसऱ्या ठिकाणी आतून कुलुप लावत त्यांनी आत्महत्या केली आहे. एक मुलगी त्यांच्या घरी गेली, तेव्हा याबाबतचा खुलासा झाला.
अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…
महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा; 300 व्हिडिओ…
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…
Video: नेत्याच्या मुलानं मला झाडाझुडपांत नेलं; अर्धनग्न महिलेचा टाहो…

