पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…

पुणे: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार निगडी येथे समोर आला आहे. पॉक्सो अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या शिक्षकाने पुन्हा पिडीत मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका शिक्षकाने 2018 मध्ये शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केले होते, तेव्हा पॉक्सो अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या शिक्षकानेच हे कृत्य केले आहे. या घटनेतील आरोपी शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्ती देवराम काळभोर असे शिक्षकाचे नाव आहे, तर अशोक जाधव हे शाळेचे प्राचार्य आहेत, ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, अविंद्र अंकुश निकम, गोरख, सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण नामदेव हेंद्रे हा पसार आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निगडी येथे ही नामांकित शाळा आहे. या शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पिडीत मुलीस वारंवार लैंगिक त्रास देत असे. पिडीत मुलीच्या वर्गातील विदयार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जात असताना व परत घेवून येत असताना पिडीत मुलीशी अश्लील चाळे करीत असे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला खूप मारीन अशी धमकी देत असे. 21 ऑगस्ट रोजी पिडीत मुलगी ही वॉशरूम वरून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…

Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!