
Video: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोराचं उडवलं डोकं…
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (ता. १३) झालेल्या गोळीबारानंतर खळबळ उडाली. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला घासून गेली असून, कानाजवळून रक्त वाहत होते. गोळीबारानंतर सीक्रेट सर्विसने त्याचे डोके उडवलं.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅली सुरू आहेत. याच प्रचार रॅलीवेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. प्रचार रॅलीवेळी व्यासपीठावर घडलेल्या या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. ट्रम्प यांना व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला ठार केले. ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
WATCH: Shooter at Trump rally opened fire from the roof of a nearby building pic.twitter.com/AgMbtLqKEe
— BNO News (@BNONews) July 14, 2024
अमेरिकन सीक्रेट सर्विसने शनिवारी सांगितले की, ‘ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये रॅलीच्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या एका उंच ठिकाणाहून व्यासपीठाच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. हल्ल्यानंतर रॅलीमध्ये गोंधळ उडाला होता. बीएनओ न्यूजने एक व्हिडीओओ शेअर केला असून त्यात शूटरने ट्रम्प यांच्यावर कुठून गोळीबार केला ते दिसत आहे. ट्रम्प यांच्यावर हल्लेखोराने जवळच्या एका इमारतीच्या छतावरून गोळ्या झाडल्या. व्हिडीओमध्ये हल्लेखोर इमारतीच्या छतावर आडवा पडल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांना दुखापत झाली असून त्यांच्या कानाच्या खालच्या भागाला गोळी लागली आहे. कानातून रक्त वाहत असल्याचंही दिसत आहे.
I fully endorse President Trump and hope for his rapid recovery pic.twitter.com/ZdxkF63EqF
— Elon Musk (@elonmusk) July 13, 2024
प्रत्यक्षदर्शींने सांगितले की, ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला काही मिनिटे छतावर पाहिले होते. पोलीस आणि सीक्रेट सर्विसने शूटर दिसल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. गोळीबारानंतर सीक्रेट सर्विसने त्याचे डोके उडवले. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. बराक ओबामा यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटले की, ‘आमच्या लोकशाहीमध्ये अशा हिंसा घडवून आणणाऱ्या गोष्टींना स्थान नाही.’
Video: रशियामध्ये दहशतवादी हल्यात 70 जण ठार…

