समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…

जालना : जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरील कडवंची जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा पूर्णपुणे चुराडा झाला आणि सात जणांचा जागीच मृत्यू झाला. स्विफ्ट कारणे धडक दिल्यानंतर ईरटीका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

शुक्रवारी (ता. २८) रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रं. MH12 MF1856 मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कार क्रं. MH47 BP5478 ला जोरदार धडक दिली. कडवंची गावाजवळ हा अपघात घडला असून, यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…

थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!