प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…

पाटणा (बिहार): बिहारमधील मुझफ्फरपूरच्या सकरा पोलिस ठाणे परिसरात एका महिलेचा पती मेहुणीसह फरार झाला, तर दुसरीकडे तिची आईही सासऱ्यासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

फरीदपूर येथील रहिवासी असणाऱ्या पीडित सुधा कुमारी यांनी घडला प्रकार सांगितला आहे. सुधा कुमारी हिचा 21 जून 2021 रोजी भगवानपूर येथील छोटू कुमारसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर जानेवारी 2024 पासून पती छोटू कुमार मेहुणीसोबत फोनवर बोलू लागला. 3 जून 2024 रोजी छोटू कुमार माझ्या लहान बहिणीला घेऊन दिल्लीला पळून गेला. तिकडेच दोघांनी लग्न केले. सोशल मीडियातून मला याबाबत माहिती मिळाल्यानंतर धक्का बसला.

एका घटनेमुळे धक्का बसला असतानाच माझ्याच आईने माझ्या सासऱ्यासोबत पळ काढला. माझी लहान बहीण आणि माझा नवरा पळून जाण्यासाठी माझी आई फूल कुमारी देवी जबाबदार आहे. माझ्या आईने दोघांना ढोली स्टेशनवर सोडले होते. ते पळून जाताना त्यांना 2000 रुपयेही दिले. त्यानंतर माझ्या आईने दोघांचा शोध घेण्याचे निमित्त केले आणि तुम्ही सासरच्या घरीच राहा, मी दोघांचा शोध घेईन, असे सांगू लागली. पण मी सोबत जाण्यावर ठाम होते. तेव्हा तिनं तू जाणार असशील तर मी येणार नाही अशी भूमिका घेतली.

आई फूल कुमारी देवी आणि सासरे बिराजी भगत हे दोघे पतीआणि लहान बहिणीला शोधण्याच्या निमित्ताने गेले. पण ते शोध घेण्यासाठी नाहीतर पळून गेल्याचे नंतर लक्षात आले. कारण माझी आई सासऱ्यासोबतच दिल्लीत राहू लागली. आता माझा फोनही उचलत नाही, असे पीडित सुधा कुमारी हिने सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…

वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…

प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…

प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!