
प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…
बंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला खुनाच्या आरोपाखाली बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रेनुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दर्शन शूगुदीपा याला अटक केली आहे. रेनुकास्वामी नावाची व्यक्ती चित्रगुर्ग नावाच्या एका मेडिकल शॉपमध्ये अस्टिस्टंट होती. नुकतेच तिचे लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल शॉपमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर शहाराच्या कामाक्षीपाल्या येथे तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाची व्हिल्हेवाट लावण्यात आली. मृताच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसून आले आहेत.
पोलिस उपायुक्त एस गिरीश यांनी या घटनेची माहिती दिली आहे. अभिनेत्याला त्याच्या मूळ गावी असलेल्या म्हैसूरमधील चामराजेंद्र प्राणी उद्यानाजवळील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे. याबबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून घेतले ताब्यात…
राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

