धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ मालधक्का रोडवर दोन जिवलग मित्रांनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ राहणाऱ्या दोन मित्रांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. रेल्वेच्या रुळावर दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. दोघांचेही वय १७ ते १८ वर्षे असून ते बारावीत शिकत होते. संकेत राठोड आणि सचिन करवर (दोघेही रा. मालधक्का रोड) अशी त्यांची नावे आहेत. लहानपणापासूनच्या दोन मित्रांचा असा शेवट धक्कादायक आहे.

संकेत आणि सचिन हे बारावीत शिकत होते. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसलाय. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…

नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…

नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!