
कंगना रणौतच्या कानाखाली मारणाऱ्या जवान महिला म्हणाली…
मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची घटना आज (गुरुवार) चंदीगड विमानतळावर घडली. विमानतळावर एका CISF च्या महिला रक्षकानंच कंगनाच्या कानशिलात लगावली. महिला जवानाने प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौत चंदीगडवरुन दिल्लीकडे रवाना होत असताना विमानतळावर हा प्रकार झाला आहे. कंगनाच्या कानशिलात मारल्यानंतर आणि तिला शिवीगाळ केल्यानंतर CISF महिला जवानाने सांगितलं की, जेव्हा कंगनाने शेतकरी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली होती आणि त्यांना म्हटलं होतं की, 100 रुपये घेऊन या शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. तेव्हा माझी आई त्या आंदोलनात होती. माझ्या आईला 100-100 रुपये घेऊन धरणा आंदोलनाला गेली असल्याचे म्हटले होते.
कंगनाने बठिंडा गावातील बहादुरगडच्या शेतकरी असलेल्या 87 वर्षीय महिंदर कौरवर ट्विट केले होते. तिनं त्यांना बाकी महिलांशी तुलना करत 100 रुपये घेऊन शेतकरी आंदोलनाला बसल्याचे म्हटले होते. त्यानंतर महिलेने कंगनाविरुद्ध कोर्टमध्ये धाव घेतली होती. याविषयी 13 महिने सुनावणी सुरु होती.

महिलेनं कंगनावर आरोप केले होते की, कंगनानं तिची तुलना प्रतिमा बिघडण्याचे काम केले आणि यामुळे तिला खूप मानसिक त्रास झाला. समाजामध्ये त्यांची प्रतिमा खराब झाली. दोन वर्षापूर्वीचे हे प्रकरण कंगनाला भोवले असून यामुळे कंगना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
कंगना म्हणाली की, ‘नमस्कार मित्रांनो, मला खूप सारे फोन कॉल्स येतायत, मीडिया आणि माझ्या शुभचिंतकांकडून, सगळ्यात आधी तर i am Safe, मी व्यवस्थीत आहे. आज चंदीगड विमानतळावर जे प्रकरण घडलं ते सिक्योरीटी चेकसोबत घडलं. तिथे मी सिक्योरीटी चेक करुन जशी निघाली. तर दुसऱ्या कॅबिनमध्ये जी महिला होती. ती सुरक्षा कर्मचारी होती CIFS ची तिने आधी ते निघून जाईपर्यंत वाट पाहिली आणि बाजूने येऊन माझ्या तोंडावर मारलं आणि शिव्या द्यायला लागली.’
अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

