
नाशिक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर दरोडेखोरांकडून गोळीबार…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील एक पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली आहे. पेट्रोल पंप लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर गोळीबार केला, त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मालेगावच्या झोडगे परिसरातील पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली आहे. अज्ञात दोन युवकांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यामुळे आणि पकडले जाण्याच्या भीतीतून आरोपींनी पेट्रोल पंपावर गावठी पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर आरोपी पेट्रोल पंपावरून फरार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पाहाणी करून तपासाला सुरुवात केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…
पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

