महिला डॉक्टर म्हणाली; माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस…

अहमदनगर : एका महिला डॉक्टरने परिचारिकेला घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित परिचारिकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप यांच्या विरोधात बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलवंडी येथे एका महिला डॉक्टरने परिचारिकेला घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. माधुरी जगताप परिचारिकेच्या घरी जाऊन “तू माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस?”, अशी विचारणा केली. त्यानंतर सोबत आणलेल्या लोखंडी गजाने परिचारिकेला मारहाण केली. एवढंच नाहीतर “माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही, मी कशाला मॅसेज करू”, असे परिचारिकेनं महिला डॉक्टरला सांगितले. मात्र, तरीही डॉ. माधुरी जगताप काही थांबल्या नाहीत. त्यांनी हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून परिचारिकेला मारहाण सुरूच ठेवली. याप्रकरणी परिचारिकेने महिला डॉक्टरविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पीडित परिचारिकेने फिर्यादीत सांगितल्यानुसार, ‘महिला डॉक्टरने लोखंडी गजानं जबर मारहाण केलीच, पण त्यासोबतच “पुन्हा जर नादी लागली तर फाशी देऊन मारीन… गावात राहिली तर सुपारी देऊन मारून टाकीन… कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही.’, अशा धमक्याही वारंवार दिल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकरासोबत बायको पळाली; दुसरी आणल्यावर पहिली आली माघारी अन्…

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…

मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…

त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!