पोलिसकाकाका विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत वेगळेच गूढ…

मुंबई: मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचारी विशाल पवार यांच्या मृत्यूचा तपास करत असताना जबाबात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील तपासाबाबत वेगळीच माहिती समोर येत आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर समजू शकणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोबाईल चोरट्याचा पाठलाग करताना चोरट्याने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलिस शिपायी विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत अनेक बातम्या समोर आल्या. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असताना त्यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळालेल्या माहितीनूसार ही घटना मोबाईल चोरी आणि झटपट नसल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. विशाल पवार हे दारूचे अतिसेवन करायचे. तसेच घटनेच्या दिवशी कामावर न गेल्यामुळे ही कथा त्यांनी रचल्याचा संशल पोलिसांना आहे. तसेच विशाल पवारने जबाबात सबंधित घटना साडेनऊ वाजता घडली असे सांगितले होते. मात्र घटनेच्या रात्री 12 वाजेपर्यंत ते दादरच्या कैलास लस्सी दुकानाजवळ असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. त्यामुळे विशाल पवार यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला हे तपासणे सुरू असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे आयुक्तालयात वेगवेगळी पोलिस पथके नेमून तपास सुरु करण्यात आलेला असुन तपासात मृत विशाल पवार यांनी कोपरी पोलिस ठाणे येथे दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन, फलाट परिसर, रेल्वे ब्रिज, आस्थापना या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्याचा विविध तांत्रिक अंगाने तपास सुरु आहे. फिर्यादीत नमूद वेळी व त्यानंतर सुमारे पाच ते सहा तास व त्यानंतरही विशाल पवार हे सीसीटीव्ही फूटेज मध्ये इतरत्र ठिकाणी आढळले आहेत. प्रथम दर्शनी फिर्यादीत नमूद वेळी व त्याच्या आसपास माटुंगा-सायन रेल्वे स्टेशन दरम्यान फटका मारुन मोबाईलची जबरी चोरी व त्यांच्यातील झटापटीची घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे. पण, मृत्यु नक्की कोणत्या कारणाने झाला या विषयी विविध तांत्रिक व शास्त्रीय अंगाने तपास सुरु आहे. तपास युध्द पातळीवर सुरु असुन तपासाबाबत संपूर्ण सत्य समोर येण्याच्यादृष्टीने माध्यमांनी थोडा संयम दाखवून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, विशाल पवार यांच्या बाबत मोबाईल जबरी चोरीची व झटापटीची घटना घडल्याबाबतची माहिती मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयास 01.05.2024 रोजी संध्याकाळी प्राप्त झाली. सदर घटनेबाबत कोपरी पोलिस ठाणे, ठाणे शहर येथे गुन्हा रजि.क्र.399/2024, कलम 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा लोहमार्ग आयुक्तालयास वर्ग करण्यापूर्वी सदर गुन्ह्यातील फिर्यादी विशाल पवार हे मयत झाले होते. सदर गुन्ह्याची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर दादर रेल्वे पोलिस ठाणे गुन्हा रजि.क्र.522/2024, कलम 302, 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे.

पोलिसकाकाला चोरांनी टोचलं इंजेक्शन अन् झाला मृत्यू…

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…

संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!

पोलिस अधिकाऱ्याचे भिकाऱ्याने इंग्रजीमध्ये आभार मानले अन् बसला धक्का…

पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!