श्रीलंकेत रेसिंगवेळी कार घुसली गर्दीत, 7 जणांचा मृत्यू तर…

कोलंबो (श्रीलंका): श्रीलंकेतील सेंट्रल हिल्समध्ये कार रेसिंगवेळी एक कार ट्रॅकवरून बाजूला जात गर्दीत घुसल्यानंतर झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रेस मार्शल आणि एका ८ वर्षांच्या एका मुलीचा सुद्धा समावेश आहे.

राष्ट्रीय नववर्षाच्या निमित्त श्रीलंकेच्या लष्कराने फॉक्सहिलसुपर क्रॉस २०२४ रेसचे आयोजन केले होते. ही रेस पाहण्यासाठी एक लाखांहून अधिक नागरिक उपस्थित होते. श्रीलंकेच्या मध्य हायलँडसमधील शहर दियातलावामध्ये रविवारी (ता. २१) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एक कार ट्रॅकवरून बाहेर गेल्याने घडलेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मोठा गोंधळ उडाला होता.

दरम्यान, नव्या वर्षाची सुट्टी साजरी करण्यासाठी श्रीलंकन नागरिक सेंट्रल हिल्समध्ये येतात. कार रेसिंग आणि घोडेस्वारीच्या स्पर्धांचे आयोजन होते. श्रीलंकेच्या लष्कराने याआधी २०१९ मध्ये फॉक्सहिलचे आयोजन केले होते. त्यानंतर देशात इस्टर हल्ल्यांचे प्रकार घडले. त्यामुळे शर्यतींना ब्रेक लागला होता. पाच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा शर्यतीचे आयोजन केले होते.

Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

Video: सर्कसमधील अपघात पाहून पोटात येईल गोळा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!