
पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…
पुणे: महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना आळंदी येथे शनिवारी (ता. २०) उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
ज्ञानेश्वर गजानन इंगाले (वय 31, रा. आळंदी देवाची. मूळ रा. कुटी पांगरी, ता. मालेगाव, वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर घुले यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आळंदी मधील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आढळला होता. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केली. आरोपी कामानिमित्त आळंदी येथे मागील दोन ते अडीच वर्षांपासून आला होता. तो मजुरीचे काम करून आळंदी घाटावरच झोपत असे.’
दरम्यान, काही दिवसांपासून एक महिला देखील आळंदी घाटावर वास्तव्यास आली होती. आरोपी ज्ञानेश्वर इंगाले याची त्या महिलेसोबत ओळख झाली होती. खुनाच्या घटनेच्या आदल्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच दिवशी ती महिला एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली. त्यामुळे महिलेवर संशय आल्याने इंगाले याने महिलेच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून तिचा खून केला. पुढील तपास दिघी पोलिस करीत आहेत.
पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…
पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…
पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…
पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

