ट्रक आणि बसमध्ये झालेल्या अपघातात २१ पोलिस जखमी…

बैतूल (मध्य प्रदेश): छिंदवाडा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस बैतुलमार्गे राजगडला जात असताना झालेल्या अपघातात बस मधील २१ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

अपघाता जखमी झालेल्या पोलिसांपैकी १२ पोलिस कर्मचाऱ्यांना शाहपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, तर नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना बैतूल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज (शनिवार) पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमाराला झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच बैतुलचे पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्यासह वरीष्ट पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मध्य प्रदेशातील सिधी, शहडोल, जबलपूर, मंडला, बालाघाट आणि छिंदवाडा या सहा लोकसभा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. पोलिस कर्मचारी छिंदवाडा मतदार संघातील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. नीम पाणी ढाब्याजवळ अचानक ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात २१ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…

पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!