
प्रेम प्रकरण! डोळ्याचे आश्रू सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा…
पुणे (सचिन मदगे): पुणे शहरातील धायरेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात 13 एर्प्रिल रोजी एक घटना घडली. वेळ सकाळी आठची. सर्व सहकारी सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, संपून परतीच्या वाटेने निघाले होते. एक महिला दोन मुलां समवेत, भयभीत. दबक्या स्वरात, चल बीचल अवस्थेत थांबली होती. यावेळी सहकार्यांना तिचे ते भाव जाणून घेऊशी वाटले.
महिलेने केलेले वर्णन…
परराज्यातील महिला, प्रेम प्रकरणात गुंतून आई, वडील, भाऊ यांना सोडून एकासोबत आली होती. सुरवातीचे काही दिवसा आनंदात गेले. पण, दोनच वर्षात आंधळ्या प्रेमाची व्यथा सुरू झाली. दोन मुलींची प्रसूती झाल्या नंतर तो त्रास देऊ लागला.
बदललेली मानसिक भावना…
दोघात हेवे दावे चालू झाले. प्रेमाचं रूपांतर भांडणात सुरू झाले. दिवसेंदिवस मारहाणीत वाढ होत राहिली. अंगावर मारहाणीचे दाग दिसू लागले. मारहाणीत झालेली जखम अमाणे काका, राजू साळवी इतर सहकार्यांच्या नजरेत पडली. एक महिला या नात्याने विचार करू पाहणाऱ्या मयुरी सुषमा यांच्या नजरेत पडली. यांनीच त्याच्या लहान मुलांचा विचार करून त्यांना नाष्टा व चहा पाणी देवून खाऊ घातले.
पुढील मार्ग शोधू लागलो…
भाजप , पुणे शहर अध्यक्ष मनीषा राजेंद्र धुमाळ, सोनाली करंजकर मी स्वतः याच्या बरोबरीने मदतीचा ओघ धरला. मयुरी सुषमा यांनी बाल समितीचा मार्ग दाखवून गुन्हा नोंदवला. दोन चिमुकल्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, जगण्याला दिशा मिळावी यासाठी मयुरी, सोनाली, मनीषा यांनी वाट शोधली. पोलिस स्टेशनची प्रक्रिया पार पडल्यानंतर बाल समिती संस्थेत नियोजनाची कास धरली. संबंधित व्यक्तीचे अगोदर विवाह झाला असून, त्याला आठ अपत्ये आहेत आस खुलासा पीडित महिलेने केला आहे.
नागरिकांचे सहकार्य…
पीडित महिलेला ससून हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी दाखल केले. या साठी दिवसभर उपाशी पोटी वणवण फिरून, तपासणी साठी शासकीय पोलिस कर्मचारी याची मदत मिळत नाही. सकाळी ११ वाजता गेलेल्या महिला नागरिक संध्याकाळ पाच वाजे पर्यंत ससून मध्ये अन्न पाण्या वाचून न्याय देण्यास जीवाची बाजी लावत होत्या. स्वत पाचशे रुपये खर्च करून पीडित महिलेस साथ देत होत्या. कारण चिमुकल्यांना जगण्याची उमेद जिवंत राहण्यासाठी.
एका महिलेने घेतलेला निर्णय तिचे जीवन उद्ध्वस्त करण्यास किती करणीभूत आहे. दोन अपत्य. या सुद्धा भरडल्या जाणार याचे दुःख. सोबतीला असणाऱ्या सहकारी वर्गाकडून जाणवत होत्या. यासाठी बाल समिती योजने अंतर्गत त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न शिल होत्या. परंतु, मुलीची आई, अत्याचारित महिला, बाल समितीचा वापर करण्यास मनाई करत होत्या. मनपरिवर्तन होत नाही, हे कळल्या नंतर सौ. मनीषा, सोनाली करंजकर यांनी तिच्या पुढे हतबल होऊन , तिला तिचा निर्णय विचारला. स्वतः धूने भांडी करून मुलींना सांभाळेल याची खात्री देत होती. पण आमची पावले तिथून काढता पाय घेत नव्हती.. सरकारी यंत्रणा, अत्याचारित महिला याच्या पुढे नांगी टाकली.
अखेर चा प्रयत्न…
पीडित महिलेला न्याय मिळावा, त्या व्यक्ती वर कारवाई व्हायला हवी. महिलेला तिच्या राहत्या घरी जावून, काही मार्ग निघेल का, याची चाचपणी केली. परंतु, तो ,दारू पिवून पत्नीस शिवी गळी करत होता.
पीडित महिलेला न्याय मिळेल का, चूक कोणाची हे शोधणे, त्याचा न्याय निवडा आमच्या हातात नव्हते. पोलिस यंत्रणा नक्कीच तपास करून कारवाई करले, अशी अपेक्षा आहे. पण जनतेने जागृत राहणे आणि न्याय व्यवस्थेवर आवाज उठवणे गरजेचे आहे.

