
पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका युवकाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अनेक दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत. एका गाळ्यामध्ये युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. बिबवेवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी त्या तरूणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बसवराज चिदानंद गजंत्रे याने नातेवाईकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरले होते. तो वाईटसाईट बोलला होता, यामुळेच वाद झाला आणि संशयित आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगड घालून मारहाण केली. यामध्ये बसवराज हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…
पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार…
धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…
पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…
पुणे शहरात आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

