
प्रियकराचा मित्र युवतीला शारीरिक संबंधाचे व्हिडीओ असल्याचे म्हणाला अन्…
सातारा : प्रियकर आणि तुझ्या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ माझ्याकडे असून, ते व्हायरल करेन अशी धमकी देऊन एकाने युवतीवर (वय २२) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून युवतीच्या प्रियकरासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
आकाश जाधव आणि पीडित युवतीचे प्रेमसंबंध होते. आकाश लग्नाचे आमिष दाखवून पीडित युवतीला शहरातील एका लॉजवर घेऊन गेला होता. आकाश आणि पीडित युवतीने तिथे शरीरसंबंध ठेवले होते. लॉजवरचा तुमचा दोघांचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. तो व्हायरल करेन अशी धमकी संकेत अशोक पवार याने पीडित युवतीला दिली. त्यानंतर गोडोली येथे मित्राच्या घरी अनेकदा बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच आकाश जाधव याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी संबंध ठेवले.
पीडित युवतीने दोघांनी केलेल्या अत्याचाराला कंटाळून शेवटी पोलिसात धाव घेतली. आकाश जाधव याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप युवतीने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश जाधव आणि संकेत पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…
धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…
हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…
धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

