पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…

पुणेः पुणे शहरातील बुधवार पेठेत भरदिवसा एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यात खुनाचे सत्र सुरू असल्याचे खळबळ उडाली आहे.

मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन युवकांनी महिलेचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा थोरात ही फिरस्ती असून तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यव्यसाय करतो. 10 ते 15 दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल वर्षा थोरात हिने चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने व गौरव यांनी वर्षा थोरात हिच्याकडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने थोरात खाली कोसळली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन दोन जणांना अटक केली आहे.

दरम्यान, पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औंधमध्ये शनिवारी (ता. १०) एकाने सहकाऱ्यावर गोळीबार करत आत्महत्या केली. बुधवार पेठेत शुक्रवारी (ता. ९) एकाने वस्ताऱ्याने व्यक्तीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर रविवार (ता. ११) सकाळी मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात असलेल्या रेंज हिल परिसरात घडली आहे.

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल…

पुणे शहरात बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!