
नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…
नाशिक : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हाती लागल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
आयकर विभागाने मागील आठवड्यात ही छापामारी केली होती. ८ सरकारी कंत्राटदारांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा टाकला गेला. यासाठी २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करत होते. सलग चार ते पाच दिवस 8 हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. 850 कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. या छाप्यात 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहेत. महापालिकेच्या कंत्राटदारांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित रक्कम सरकारी व खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवण्यात आली होती. याशिवाय इतरत्र दोन कोटींची रोकड, ३ कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटे सापडली. विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहारांची कागदपत्रे कर्मचारी, नातलगांच्या घरी लपवल्याचेही उघड झाले आहे. छाप्यात आयकर विभागाने मोठ्या शिताफीने व्यवहाराची कागदपत्रे हस्तगत केली. अनेक ठेकेदारांच्या झाडाझडतीत आयकर विभागाला सापडले पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सापडले आहेत. घराच्या छतात ठेवेलेले पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सापडल्याचीही माहिती मिळाली आहे. एका व्यावसायिकाने थेट घरातील पांख्यालाच 2 जी बी पेन ड्राईव्ह चिकटवला होता. यामध्ये मद्य व्यवसायाच्या शेकडो कोटींच्या व्यवहाराची माहिती होती. या शिवाय एका व्यावसायिकाने तर गाडीत रोकड ठेवून ती गाडी झाडा झुडपात लपवल्याचीही माहिती समोर आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…
शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…
मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…
बिल्डर अपहरण प्रकरण! भारत-पाक सीमेवजवळून 1 कोटी 33 लाखांची कॅश जप्त…
पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

