
बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…
बीड : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंब्या ससेवडी गावाजवळ कंटेनर व पिकपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.
ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण महाजनवाडी गावातील आहेत. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणेः
प्रल्हाद सिताराम घरत (वय 63, रा. महाजनवाडी ता.जि. बीड)
नितिन प्रल्हाद घरत (वय 41, रा. महाजनवाडी ता जि. बीड)
विनोद लक्ष्मण सानप (वय 40, रा. वाघिरा ता.पाटोदा जि.बीड), दोघांची नावे अद्याप समजू शकली नाही.
कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…
दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…
साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

