
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरात आज (शुक्रवार) गोळीबार करण्यात आला होता. एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु,उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड येथे गोळीबार केला. यावेळी शरद मोहोळ याला चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने वनाज सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मोहोळ याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु केली आहे. पूर्ववैमन्यास्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, काही महिन्यापूर्वीच शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शरद मोहोळ ही अनेक हिंदुत्ववादी संघटनाच्या व्यासपिठावर उघडपणे वावरत होता. आज त्याच्या लग्नाचाही वाढदिवस होता. दुपारी सुतारदरा येथील राहत्या घरून तो दुचाकीवरून बाहेर पडला, तेव्हा चार हल्लेखोरांनी त्याला घेरून गोळीबार केला. यातल्या चार गोळ्या मोहोळ याला लागल्या. त्याच्यावर वनाज येथील सह्याद्री हॅास्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. पण दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते.
शरद मोहोळ आणि आलोक भालेराव याला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याने दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव या दोघांनी 2012 मध्ये कातील सिद्दीकीचा येरवडा जेलमध्ये खून केल्याचा आरोप आहे. या खटल्यातून त्याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पुणे शहरात खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…
पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…
पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

