भरधाव कारने चौघांना चिरडले विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू अन्…

जळगाव : भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे गुरुवारी (ता. ४) सायंकाळी घडली. अपघातानंतर कार पलटी झाली. या अपघातात एका विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा गावाजवळ कारने चौघांना चिरडले. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात होते तर शेजमजूर घराकडे परतत होते. अपघातात दुर्वा पाटील, ऋतुजा भोईटे, सुभाष रामा पाटील, परशुराम पाटील यांना कारने चिरडले. गाडीने चौघांना चिरडल्यानंतर गाडी पलटी झाली. या अपघातात सुभाष पाटील (वय ६०) आणि दुर्वा पाटील (वय १५) हे जागीच ठार झाले. अपघात गाडीने चौघांना धडक दिल्याने रस्त्याकडेच्या शेतात काही जण उडून पडले. तर गाडीतील युवकांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. अपघातात परशुराम पाटील आणि ऋतुजा भोईटे हे जखमी झाले आहेत. परशुराम पाटील यांना उपचारासाठी जळगावला दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची ही घटना एवढी भिषण होती की काही कळण्याच्या आतच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील हे जागीच ठार झाले. गावकर्‍यांनी गाडीने उडून दिलेल्यांना रस्त्यालगतच्या शेतातन अचलून आणण्या अगोदरच जळगाव कडुन येणार्‍या पोलीस गाडीने गाडीत बसलेल्या तरूणांना तत्काळ पाचोरा पोलिसात आणले. दरम्यान परशुराम पाटिल यांना उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले असुन ऋतुजा राजु भोईटे या मुलीवर पाचोर्‍यात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…

अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…

ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!