
वाकड पोलिसांनी चोरी करणाऱ्या तमिळनाडूच्या गॅंगला केले जेरबंद अन्…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात सकाळचे वेळी उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन घरातील लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या तमिळनाडूची गँग जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एकूण २३ गुन्हे उघड करीत १४,३०,००० रुपये किंमतीचे ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप जप्त केले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सकाळचे वेळी लोकांचे घरांचे उघडे दरवाजावाटे घरात घुसून घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाल्यामुळे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पहाटेचे वेळी जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालुन संशयीतांना ताब्यात घेवून गुन्हे उघड करणेबाबत आदेशीत केले होते.
वाकड पोलिस स्टेशन हद्दीत देखील सकाळचे वेळी घरात घुसुन लॅपटॉप / मोबाईल चोरीचे घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत असल्याने मा. पोलिस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे यांनी तपास पथकातील सपोनि. संतोष पाटील व पोउपनि. सचिन चव्हाण यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे जास्तीत जास्त अंमलदार हे पहाटेचे वेळी गस्तकरीता नेमुन त्यांचे नेमलेले बातमीदारांचे मार्फत माहिती काढुन सदरचे गुन्हयांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. दाखल गुन्हयांचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत तीन वेगवेगळया वर्णनाचे आरोपी हे वाकड हद्दीत चो-या करुन काळेवाडी फाटा येथूनच ते रिक्षाने पिंपरीकडे जात असलेचे निदर्शनास आले. त्यामुळे सपोनि.संतोष पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागातील अंमलदार यांचे वेगवेगळे ०४ पथके तयार करुन भुमकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी या ठिकाणी सापळा कारवाई करुन सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत मिळून आले.
आरोपी एक-दोन दिवस गॅप ठेवून गुन्हा करण्यासाठी येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सापळा कारवाई मध्ये सुरवातीला दोन दिवस कोणीही संशयीत मिळुन आले नाहीत. सापळा कारवाई सुरू ठेवत संशयीतांचा शोध सुरु असताना काळेवाडी फाटा येथे एक जण संशयीतरित्या चालत जाताना दिसला. त्याचा चेहरा सीसीटिव्ही मधील संशयीतासारखा दिसल्याने त्याला लागलीच ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याच्याकडे ०३ मोबाईल व ०२ लॅपटॉप मिळुन आले. त्यामुळे शोध सुरु असणारे हेच आरोपी आहेत हे सिध्द झाले. आरोपीचे नाव सौंदराजन गोविंदन (वय २१ वर्षे मुळ रा. नं. ७५, उदयराज पालयम, पो. थोट्टलाम, मादनुर ता. अंबुर जि. वेल्लोर राज्य- तामीळनाडू) असे आहे. त्याच्याशी बोलतांना भाषेची अडचण निर्माण झाली, आरोपीला तामिळ भाषा सोडुन कोणतीही भाषा येत नव्हती. वाकड पोलिस ठाणेकडिल पोशि. सतीश पिल्लामारी यांना सदर भाषा येत असल्याने त्यांना तपास टिम मध्ये घेण्यात आले.
आरोपी तामिळनाडू राज्यातील ज्या भागातील आहे तेथे याच पध्दतीचे गुन्हा करणारे आरोपी राहतात, तसेच सदर आरोपी गुन्हयातील मुद्देमाल परत करत नाहीत अशी माहिती प्राप्त झाली. आरोपी ज्या ठिकाणी राहतात तेथे आरोपी ठरवलेल्या वेळेत परत आले नाहीत तर त्यांचे कुंटबातील इतर सदस्य व साथीदार रुम सोडुन मुद्देमालासह पळुन जातात अशी माहिती प्राप्त झाली. ताब्यात असलेला आरोपी कोणतेही सहकार्य करत नव्हता तसेच राहण्याचा पत्ता सांगत नव्हता. त्यामुळे तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपी भोसरी येथे राहण्यास असल्याचे निष्पन्न केले. परंतु तपास टिम भोसरी येथे पोहचण्यापुर्वी आरोपीचे साथीदार व कुंटबिय पळुन गेले होते. त्यांचे मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास केला असता पळून गेलेले आरोपी हे त्यांचे मुळ गांवी तामिळनाडू येथे जाण्यासाठी बैंगलोर (कर्नाटक) येथे जाणार हे निष्पन्न केले. पंरतु त्यानंतरही पुण्यातुन बैंगलोर जाण्यासाठी अनेक बस, ट्रॅव्हल्स, ट्रेन असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. परंतु तपास पथकाने आरापींचा कौशल्यपुर्ण तपास करीत पळुन जात असलेले आरोपी हे एम. आर. ट्रॅव्हल्स ने जात असल्याचे निष्पन्न करीत सदर ट्रॅव्हल्सचा पाठलाग करित खंबाटकी घाट सातारा येथे जावून गाडी थांबवुन आरोपी
१) गुनासेकर संकर (वय २१), २) तामीलारसन मादेश (वय २१, सर्व सध्या रा. चंद्रशेखर माणिकचंद जैन यांचे खोलीत, जैनशांती अदिनाथनगर, सुखवानीबाग, भोसरी पुणे मुळ रा. नं. ७५, उदयराज पालयम, पो. थोट्टलाम, मादनुर ता. अंबुर जि. वेल्लोर राज्य- तामीळनाडू) ताब्यात घेतले. आरोपींचे कडे अनेक लॅपटॉप व मोबाईल मिळुन आले. तिन्ही आरोपींना गुन्हयात अटक करून त्यांचेकडे तपास केला असता सदरचे आरोपी हे तामीळनाडु राज्यातून चोरी करण्याचे उद्देशाने पिंपरी चिंचवड परीसरात येवून वेगवेगळ्या भागांमध्ये सकाळचे वेळी फिरुन उघडे असलेले घरात प्रवेश करुन घरातील मोबाईल लॅपटॉपची चोरी करुन, त्याची तामीळनाडु राज्यात जावुन विक्री करीत असलेबाबत समजले.
आरोपींनी वाकड हद्दीत तसेच पिंपरी चिंचवड मधील वेगवेगळया ठिकाणी घरांमध्ये चोऱ्या केलेचे कबुली दिली. त्यांच्या राहते घरांची झडती घेतली असता त्यांचे घरामधून मोठया प्रमाणावर मोबाईल व लॅपटॉप मिळून आले. आरोपी यांनी चोरलेले काही लॅपटॉप व मोबाईल फोन त्यांचे मुळ गांवी तामिळनाडु येथे पाठवल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांचे परवानगीने पोउपनि. सचिन चव्हाण व अंमलदार असे तामिळनाडू येथे जावुन कौशल्यपुर्ण तपास करित अनेक लॅपटॉप व मोबाईल फोन जप्त केले. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले मोबाईल व लॅपटॉप बाबत पिंपरी चिंचवड मधील विविध पोलिस स्टेशनला एकुण २३ गुन्हे दाखल असुन आरोपींकडुन एकुण ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप सह रोख रक्कम असा एकुण १४,३०,०००/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. संजय शिंदे, सह पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि रमेश खेडकर यांनी मिळून केली आहे.

वाकड पोलिसांनी अवैध रित्या गॅसची चोरी प्रकरणी तिघांना घेतले ताब्यात…
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…
पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…
पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

