
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्याला युनिट 5 ने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला युनिट 5 कडून अटक करण्यात आली असून, मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पो.हवा राजस शेख, मपोहवा पल्लवी मोरे, पोना.पृथ्वीराज पांडुळे, पो ना दाऊद सय्यद २२/१२/२०२३ रोजी कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत प्रतिबंधक पेट्रोलींग करत होते. सोमजी चौक येथे पोहवा. राजस शेख व पो ना. पृथ्वीराज पांडुळे यांना त्याचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एकाने घरफोड्या चोरी केली असून, चोरी केलेले सोने विक्री करणेसाठी विठ्ठल मंदिराजवळ कोंढवा खुर्द पुणे येथे थांबलेला आहे. टीमने खात्री करुन त्याठिकाणी त्यास पकडले. दानिश मकबुल शेख (वय २६ वर्षे रा. गल्ली नंबर १२, धम्मदिप चौक, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशामध्ये एकूण 3,78,000/- रू किमतीचे 73 ग्रॅम सोन्याचे दागीने व एक मोबाईल फोन मिळुन आला आहे. त्याने काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, d मार्ट या परिसरात घरफोड्या केल्याचे कबूल केल्याने त्याबाबत खात्री केली असता खालील प्रमाणे उघडकीस आले आहे.
1. कोंढवा पो.स्टे.गु. र. नं 747/2023 भा द वी कलम 454,457,380
2. कोंढवा पो.स्टे.गु. र. नं 945/2023 भा द वी कलम 457,380
3. कोंढवा पो.स्टे.गु. र. नं 1288/2023 भा द वी कलम 454,380
4. कोंढवा पो.स्टे.गु. र. नं 144/2023 भा द वी कलम 380
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी कोंढवा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे 2 पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 5 गुन्हे शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलिस अमलदार रमेश साबळे, राजस शेख, पृथ्वीराज पांडूळे,दाउत सय्यद, पल्लवी मोरे यांनी केली आहे.

पुणे शहरातील महिलेच्या खूनाचा तपास युनिट ५ने २५० सीसीटीव्ही तपासून केला उघड…
पुणे शहरात अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ने १० गुन्हे केले उघड…
पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

